रावण : राजा राक्षसांचा - सदरील कादंबरी ही कहाणी आहे एका खलनायकाची , ही कहाणी आहे रावणाची बाजू मांडणारी, ही कहाणी आहे एका सुडाची,एका परभवाची ही कहाणी आहे . ही रामायणातील पराक्रमी, विद्वान, वेदपंडीत, कट्टर शिवभक्त अश्या लंकेच्या राजाची कहाणी आहे . पण रावण खलनायक कसा? हेच या कादंबरीतून कळत . आपण आतापर्यंत फक्त असच वाचल ,ऐकल की रावण हा रामायणातील दुष्ट ,दहा डोके असणारा खलनायक आहे . पण खरच अस आहे का ? रावण सूरवाती पासुनच खलनायक होता का ? एवढा विद्वान तो खलनायक कसा बनला . हे सगळे लेखकाने सदरील कादंबरीतून सविस्तरपणे मांडल आहे .आजवरची पुराण, कथा, साहित्य, कला यामधून रावणाला दुर्गुणी, अवगुणी प्रवृतीचा राक्षस म्हणून हिनवल गेलं . परंतु रावणसंहिता, कुमारतंत्र, सामवेदातील ऋचा, शिवतांडवस्स्तोत्र, वीणा, बुद्धिबळ यांची निर्मिती रावणाने केली हे कस विसरून चालेल . या कादंबरीतील मजकूर सर्वच सत्य आहे की नाही ते माहीत नाही ,परंतु ही कादंबरी म्हणून अतिशय उत्कृष्ट आहे . एका खालनायकाची बाजू मांडणारी ही कादंबरी रावनाबद्दल विचार करण्यास भाग पाडते.
आजवर आपण हेच ऐकल की सिता दुष्ट राक्षस राजा रावण याच्या कैदेत राहून सुद्धा कशी पवित्र राहिली, तिने कसे स्वतः ला हतबल परिस्थितीत सांभाळल. पण कादंबरी वाचल्यानंतर लक्षात येतं की, सिता ने पवित्र राहिली ही फक्त सितेच सामर्थ्य नव्हत तर रावणाची मर्यादा सुद्धा होती. रावणाने सीतेचे अपहरण जरी दुष्ट पणे केलं असेल तरी त्याने त्याच्या कैदेत असताना स्वताच्या शक्तीचा वापर करून सीतेचे विटंबना केली नाही हे नक्की लक्षात घ्यायला पाहिजे. नाहीतर रावण सीतेचे अपहरण करू शकत होता तर तिच्या इच्छे विरुद्ध तीच्याशी वाईट सुद्धा वागू शकत होता. ही असुर विरुद्ध देव, आर्य अशी सुडाची कहाणी आहे. जस की कादंबरी सुरुवातीला आपल्या लक्षात येत की रावणाची आई कैकाशी आणि रावणाच्या दोन मावशांना बंदिस्त करून कुबेराने त्यांना त्याच्या बापाच्या म्हणजे विश्रवाच्या आश्रमात नेऊन ठेवले. तेव्हा विश्रवा एक ऋषी असून सुधा त्यांच्याशी अत्यंत निर्दयी पणाची वागणूक देवून त्याच्याशी संग केला. लग्न न करता तिघी बहिणीचे शोषण केले. नंतर त्या तिघीच्या आपत्याना आर्य म्हणून स्वीकारले नाही. रावणाने जशी सीता प्रती मर्यादा पाळली ,तशी मर्यादा विश्रवाणे एक ऋषि असून सुद्धा पाळली नाही . याच कुठेतरी आश्चर्य वाटत . श्रुपनखा ही रावणाची बहिण हीच नाक कापल्याचा हा सुड होता असे रामायणात असले तरी हा फक्त असा एकाएकी निर्माण झालेला राग नव्हता . तर अनेक दिवसापासून रावणाच्या मनात खदखदत असलेली सूडाची भावना होती. अगदी जेव्हापासून रावणाला आपण असुर आहोत हे समजल्यापासूनची देवांप्रति ही निर्माण होत गेलेली तेढ होती .सुमाली आणि त्याच्या भावांची लंका कुबेरकरवी लुटून त्यांना वणवण भटकंती करावी लागली. या सगळ्यांचा सुड होता रावणाचा . देवांना स्वतः चा दास बनवणे, सीतेचे अपहरण करून रावणाने देवांचा आणि आर्यांचा सुड घेतला. म्हणून ही आहे एका साधारण दशग्रिव ते थेट रावण राजा राक्षसांचा अशी सूडाची कहाणी.
या कादंबरितून रावण म्हणजे अशी व्यक्तिरेखा होती जी आसमंत भेदणारी महत्वकांक्षा ,प्रबळ ईच्छाशक्ती ,सामर्थ्य असणारी शक्ति होती .त्याच्या तत्वासाठीच हा लढा होता .त्याच्या आयुष्यात आलेल्या अनेक संकटांचा पाढा या कादंबरितून मांडला आहे . आपण रामायणातून नेहमी ऐकलय की रावण दुष्ट होता. पण तो दुष्ट का वागला हेच या कादंबरीतून आपल्या लक्षात येत. कादंबरीच्या सुरुवातीला अतिशय सामान्य वाटणारा दशग्रिव नंतर क्रूर असा राजा राक्षसांचा कसा बनला हे स्टेप बाय स्टेप कळत जाते. रावण नेहमीच उपेक्षेचा भाग राहिला आहे. रावणाने सर्व देवांना पराभूत केले . सर्व दैत्य, दानव, असुर आणि कित्येक भटक्या जमातींना स्थैर्य दिले आणि समृद्ध केले . त्याने त्याच्या आजोबांची सोन्याची लंका पुनः मिळवली . रावण स्वतःच्या ताकदीच्या जोरावर एवढं मोठं साम्राज्य उभारतो.त्याने त्याच्या प्रजेत आणि राजा मध्ये भेदभाव केला नाही .आयुर्वेदाचा गाढा अभ्यासक असलेला रावण हा व्यापारी, व्यावसायिक असतो. दर्शन, राज्यशास्त्र आदी विषयात पांडित्य मिळवलेला रावण दुष्ट कसा ?अशा अनेक प्रश्नांचे उत्तर या कादंबरीत लेखकाने अत्यंत सुटसुटीत मांडले आहेत . तो राजा म्हणून कसा उतकृष्ट होता हे कादंबरितून कळत .एका अर्थाने खलनायक असलेल्या रावणाला लेखकाने कादंबरीतून न्याय मिळून देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे ,लेखकाचा हा प्रयत्न बऱ्यापैकी यशस्वी झाला आहे . ही कादंबरी वाचून वाचकाच्या मनात रावनाबद्दल सकारात्मक भावना निर्माण करून जाते . कादंबरीच्या शेवटी रावणाला ख
0 Comments